आजपर्यंत संस्थेने ग्रामीण व आदिवासी भागातील 7500 मुलांना शैक्षणिक स्टेशनरी व क्रीडा साहित्याचे वाटप केले आहे.
आर्थिकदृष्ट्या गरीब पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांना संस्थेने 7000 रेशन किटचे वाटप केले आहे.
संस्थेने 50000 हून अधिक जुने परंतु चांगल्या स्थितीतील कपड्यांचे वाटप केले आहे.
संस्थेने ग्रामीण आणि आदिवासी भागातील लोकांना 10000 नवीन ब्लँकेटचे वाटप केले आहे.
आजपर्यंत संस्थेने 100 पेक्षा जास्त गरीब कुटुंबांना जुन्या फर्निचरचे वाटप केले आहे.
संस्थेने आदिवासी भागातील जिल्हा परिषद शाळेतील मुलींना 21 नवीन सायकलींचे वाटप केले आहे
संस्थेने आदिवासी भागातील अपंग बांधवांना 21 व्हीलचेअरचे वाटप केले आहे.
संस्थेने ग्रामीण भागातील 200 प्राथमिक शाळेतील मुलांना दत्तक घेतले आहे. या मुलांचा सर्व शैक्षणिक खर्च संस्थेमार्फत केला जातो.
आदिवासी भागातील १०० एचआयव्ही बाधित बालकांना दर महिन्याला पोषण किटचे वाटप केले जाते.
Now Donate Our Program
प्रत्येक योगदान आम्हाला गरजूंपर्यंत पोहोचण्यास आणि त्यांच्या जीवनात महत्त्वपूर्ण प्रभाव पाडण्यास मदत करते. तुमची उदार देणगी अनेक व्यक्ती आणि कुटुंबांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने आमच्या विविध कार्यक्रमांना समर्थन देईल.